जयंत पवार यांनी मराठी कथेच्या धमन्या रुंदावण्याचे काम केले. दुय्यम, गौण म्हणून हिणवल्या गेलेल्या या वाङ्मयप्रकारास प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा मोठा हातभार आहे
मराठी कथेचा आशयाविष्कारात्मक विस्तार करण्यात जयंत पवार यांचा वाटा महत्त्वाचा आहे. कथेची बलस्थाने त्यांनी समोर आणली. शोषित, वंचितांच्या जीवनानुभवाला आवाज दिला. गेल्या चारेक दशकामध्ये नवभांडवली व्यवस्थेच्या आक्रमणाचा जनसामान्यांच्या जगण्यावर काय परिणाम झाला, याचा तळा-मुळातून शोध घेण्याचे काम केले. प्राचीन मिथकीय सृष्टीचा नवा अन्वयार्थ लावत पुढील लेखकांना नवा परिप्रेक्ष्य उपलब्ध करून दिला.......